For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीएसएस कॉलेजमध्ये आज डॉ. अनिरुद्ध पंडित यांचे व्याख्यान

11:37 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
जीएसएस कॉलेजमध्ये आज डॉ  अनिरुद्ध पंडित यांचे व्याख्यान
Advertisement

डॉ. किरण ठाकुर यांची उपस्थिती : ‘सस्टेनॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट’ व्याख्यानाचा विषय

Advertisement

बेळगाव : साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्यावतीने तात्या ऊर्फ डॉ. वाय. के. प्रभू आसगावकर स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. जीएसएस कॉलेजच्या गिरी सभागृहामध्ये डॉ. अनिरुद्ध भालचंद्र पंडित यांचे व्याख्यान होणार आहे. ‘सस्टेनॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. अध्यक्ष म्हणून एसकेईचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. पंडित यांचा परिचय पुढीलप्रमाणे-

Advertisement

डॉ. अनिरुद्ध पंडित हे संशोधक, अभ्यासक व विचारवंत म्हणून परिचित आहेत. आयआयटीमधून त्यांनी बीटेक्ची पदवी घेतली व आयसीटीमधून पीएचडीची पदवी घेतली. 1984 ते 90 पर्यंत त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये रिचर्स असिस्टंट व रिसर्च असोसिएट म्हणून काम केले.

418 हून अधिक संशोधनपर निबंध लेखन

भारतात 1990 मध्ये ते परतले व त्यांनी आयसीटीमध्ये युजीसी रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम सुरू केले. त्यांनी 418 हून अधिक संशोधनपर निबंध लेखन केले आहेत. त्यांच्या नावे पाच पुस्तके प्रकाशित आहेत. तर पंधरा पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 51 जणांनी पीएचडी पदवी घेतली आहे. 92 जणांनी मास्टर्स ही पदवी घेतली आहे. संशोधनाबरोबरच अध्यापनामध्ये त्यांना विशेष रस आहे.  त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांना ते प्रयोगासह शिकविण्यामध्ये विशेष रुची घेतात. सौरऊर्जा या क्षेत्रात ते सक्रिय असून आदिवासी समाजाला त्याचा लाभ कसा होईल, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. ऊर्जा आणि नगररचना या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘लँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ या सेवाभावी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. सध्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) चे ते कुलगुरू आहेत. तत्पूर्वी त्यांनी डीन म्हणूनही काम केले आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानीत

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मूल्यमापन समितीमध्येही त्यांनी काम केले आहे. आयआयटी मुंबईच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून सध्या ते सक्रिय आहेत. अनेक उद्योगसमूहांचे ते सल्लागार आहेत. संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Advertisement
Tags :

.