महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिजबुल्लाहवरून लेबनॉन-इराणमध्ये तेढ

06:18 AM Oct 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लेबनॉन सरकारचा हिजबुल्लाहला विरोध : इराणकडून पाठराखण

Advertisement

वृत्तसंस्था/ बैरूत

Advertisement

लेबनॉनमधील हिजबुल्लाहचे अस्तित्व हे इस्रायलसोबत लेबनॉन सरकारसाठी चिंतेचे कारण ठरले आहे. हिजबुल्लाहच्या कारवायांमुळे इस्रायल लेबनॉनला लक्ष्य करत आहे. यामुळे तेथील सर्वसामान्य जनता आणि सरकार त्रस्त आहे. लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी हिजबुल्लाहला निशस्त्र करण्याचे आवाहन केले आहे. मिकाती यांच्या वक्तव्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते हिजबुल्लाहचे पाठराखण करण्यासाठी सरसावले आहेत. इराण हिजबुल्लाहचे समर्थन करतो, कारण ताहे इस्रायल विरोधात लेबनॉनची सर्वात मजबूत ढाल आहे असे उद्गार अयातुल्ला अली खामेनेई यांनी काढले आहेत.

इस्रायल लेबनॉनचे विघटन इच्छित असल्याचा दावा खामेनेई यांनी केला आहे. इस्रायलने हिजबुल्लाह विरोधात भूमीवरी कारवाई तीव्र केली असताना लेबनॉन सरकार आणि इराणमधील मतभेद समोर आले आहेत.

23 सप्टेंबरपासून बैरूतच्या आसपास इस्रायलने हवाई हल्ले केले आहेत. या संघर्षामुळे लेबनॉनमध्ये आतापर्यंत 1522 लोक मारले गेले आहेत. तर 8 लाख लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे.

लेबनॉनचे पंतप्रधान मिकाती यांनी पॅरिसमध्ये एका संमेलनादरम्यान हिजबुल्लाह विरोधात वक्तव्य केले आहे. मिकाती यांनी लेबनॉनचे सैन्य वगळता देशातील सर्व समुहांना निशस्त्र करण्याचे आवाहन केले आहे. लेबनॉनच्या अधिकाऱ्यांना पूर्ण लेबनॉन क्षेत्रावर तैनात केले जावे. शस्त्रास्त्रs केवळ लेबनॉनच्या सैन्याकडेच असायला हवीत असे त्यांनी म्हटले आहे. 1990 मध्ये लेबनॉनमधील गृहयुद्ध संपुष्टात आल्यावरही शस्त्रास्त्रs खाली न ठेवणारा हिजबुल्लाह हा देशातील एकमात्र सशस्त्र गट आहे.

इराणचे समर्थन

हिजबुल्लाहला लेबनॉनचे राजकारण आणि सैन्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे. इराणकडुन या संघटनेला पाठबळ मिळते. हिजबुल्लाहने स्वत:चा सर्वोच्च नेता हाशेम सफीद्दीनच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर तो हिजबुल्लाहचा सर्वोच्च नेता ठरला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article