For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलांना घरी सोडून ऑफिस ट्रिप महागात

06:33 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुलांना घरी सोडून ऑफिस ट्रिप महागात
Advertisement

आईला विमानातून उतरताच पोलिसांनी केली अटक!

Advertisement

ऑफिसच्या कामासाठी चार मुलांना घरी एकटं सोडून दुसऱ्या शहरात गेलेल्या आईला विमानातून उतरताच पोलिसांनी अटक केल्याची घटना अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात घडली. आयरीन मिलर (वय 50) असे या महिलेचे नाव असून, ती लास वेगास येथे कामानिमित्त गेली होती. तिची चारही मुले घरी प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीशिवाय राहत असल्याचा आरोप पोलिसांनी केला. या प्रकरणात तिच्यावर बालसंगोपनात निष्काळजीपणा केल्याचे चार आरोप ठेवण्यात आले आहेत.

एका फोनमुळे उघडकीस आली घटना

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका मुलाने आपत्कालीन क्रमांक 911 वर फोन केला. त्याच्या नऊ वर्षांच्या भावाच्या डोक्मयावर डंबेल पडल्याने तो जखमी झाला होता. मदतीसाठी पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले असता, घरात 14, 12, 11 आणि 9 वर्षांची चार मुले एकटीच असल्याचे आढळले. जखमी मुलाला ऊग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. या घटनेमुळे मुलांच्या देखरेखीचा प्रŽ गंभीर बनला आणि पोलिसांनी त्यांच्या आईशी संपर्क साधला.

पाच दिवसांहून अधिक काळ घरापासून दूर

तपासात आयरीन मिलर 18 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातून लास वेगासला गेल्याचे समोर आले. ती 23 ऑक्टोबर रोजी परत येणार होती. पोलिसांशी फोनवर बोलताना तिने आपण कामासाठी लास वेगासमध्ये असल्याचे सांगितले. मुलांची काळजी घेण्यासाठी टॅम्पा येथून एक बेबीसिटर येत असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. ही व्यक्ती सकाळी मुलांना शाळेसाठी तयार होण्यास मदत करत होती आणि शाळा सुटल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी येत होती. मात्र, ती रात्री मुलांसोबत घरात थांबत नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी चारही मुले प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीशिवाय राहत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

विमानतळावरच पोलिसांची कारवाई

आयरीन मिलर 23 ऑक्टोबर रोजी लास वेगासहून फ्लोरिडामध्ये परतली. तिचे विमान उतरल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी विमानातून बाहेर पडत असतानाच तिला ताब्यात घेतले. या कारवाईचे दृश्य पोलिसांच्या बॉडी-पॅमेरा फुटेजमध्ये कैद झाले. त्यानंतर तिला ऑरेंज काउंटी कारागृहात दाखल करण्यात आले. चार मुलांच्या बाबतीत गंभीर शारीरिक इजा न झालेल्या बालनिष्काळजीपणाचे चार आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत.

मुलांची जबाबदारी वडिलांकडे

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी चारही मुलांना आपल्या घरी नेले. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेची तातडीची व्यवस्था करण्यात आली. ओसिओला काउंटीचे शेरीफ ख्रिस ब्लॅकमॉन यांनी सांगितले की, मुलांची योग्य देखरेख आणि काळजी न घेतल्याच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल आणि जबाबदार पालकांविऊद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे कामानिमित्त प्रवास करताना अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेची आणि प्रौढ देखरेखीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Advertisement
Tags :

.