For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संगीत शिकल्याने वाढत्या वयातही मेंदू राहतो युवा

06:57 AM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
संगीत शिकल्याने वाढत्या वयातही मेंदू राहतो युवा
Advertisement

स्मृतीपासून अनेक हिस्स्यांमध्ये होतात बदल

Advertisement

वय वाढण्यासोबत मानवी मेंदूत हळूहळू संरचनात्मक बदल घडू लागतात. वैज्ञानिक अध्ययनानुसार वयाच्या 40 वर्षांनंतर हे बदल अधिक स्पष्ट होऊ शकतात. या प्रक्रियेला बेन एट्रोफी किंवा ब्रेन श्रिंकेज म्हटले जाते. परंतु मानसिक स्वरुपात सक्रीय जीवनशैली आणि विशेष स्वरुपात कुठल्याही संगीत वाद्याला शिकणे मेंदूची ही प्रक्रिया मंदावण्यास मदत करू शकते असे तज्ञांचे सांगणे आहे.

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑन एजिंग, हार्वर्ड हेल्थ आणि नॅशनल ज्योग्राफिकमध्ये प्रकाशित संशोधनानुसार वय वाढल्यावरही मेंदूत नव्या तंत्रिका साखळा निर्माण करण्याची क्षमता कायम असते. संगीत शिकणे मेंदूच्या अनेक हिस्स्यांना एकत्रित सक्रीय करते, याचमुळे याला फुल-ब्रेन वर्कआउट मानले जाते. वाढत्या वयासोबत मेंदूंच्या पेशींदरम्यान संचार मंदावतो, विशेषकरून स्मृती, निर्णयक्षमता आणि लक्ष नियंत्रित करणाऱ्या हिस्स्यांमध्ये बदल दिसून येतात असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement

व्यक्तीनुसार बदलते प्रक्रिया

वयासोबत ग्रे मॅटर आणि व्हाइट मॅटर दोन्हींमध्ये हळूहळू घट होऊ शकते असे एमआरआय अध्ययनांमध्ये आढळून आले आहे. परंतु ही प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीत समान असू शकत नाही असे वैज्ञानिक स्पष्ट करतात. जीवनशैली, शिक्षण, तणाव, सामाजिक सक्रीयता आणि शारीरिक आरोग्य यासारखे अनेक घटक याच्या वेगाला प्रभावित करतात.

स्मरणशक्ती अन् एकाग्रता

तज्ञांनुसार जेव्हा एखादा व्यक्ती पियानो, गिटार, तबला, वायलिन किंवा अन्य वाद्य शिकतो, तेव्हा मेंदूचे अनेक हिस्से एकाचवेळी काम करतात. हात आणि बोटांच्या हालचालींसाठी मोटर कॉर्टेक्स सक्रीय होतो. स्वर आणि ताल ओळखण्यासाठी ऑडिटरी सिस्टीम काम करते. स्मरणशक्ती आणि एकाग्रतेशी निगडित हिस्से सातत्याने सक्रीय राहतात. भावनात्मक प्रतिक्रिया आणि रचनात्मकता देखील यात सामील असते. याचमुळे संगीत प्रशिक्षणाला मानसिक लवचिकता वाढविणाऱ्या हालचालींमध्ये सामील केली जाते.

महिलांमध्ये चांगला प्रभव

महिलांमध्ये देखील वय वाढण्यासोबत मेंदू आकुंचित पावण्याची प्रक्रिया होते, परंतु रजोनिवृत्तीनंतर हार्मोनल बदल यात अतिरिक्त भूमिका बजावू शकतात. विशेष स्वरुपात एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर घटल्याने स्मृती आणि संज्ञानात्मक क्षमता प्रभावित होऊ शकते. नियमित मानसिक हालचाली संगीत, योग, ध्यान आणि सामाजिक बंध महिलांमध्ये देखील आरोग्य चांगले ठेवण्यास सहाय्यभूत ठरू शकतात असे तज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.