For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Summer Cotton Saree Fashion | उन्हाळ्यात कॉटन साडीचाच ट्रेंड का वाढतो? जाणून घ्या खास कारणं

05:04 PM May 11, 2026 IST | NEETA POTDAR
summer cotton saree  fashion   उन्हाळ्यात कॉटन साडीचाच ट्रेंड का वाढतो  जाणून घ्या खास कारणं
Advertisement

                             हलकी, स्टायलिश आणि आरामदायी! कॉटन साडीचा वाढता ट्रेंड

Advertisement

उन्हाळा सुरू झाला की फॅशनमध्ये सर्वात जास्त चर्चेत येते ती म्हणजे … कॉटनची साडी!हलकी, आरामदायी आणि सुळसुळीत... ही साडी उन्हाळ्यात प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती असते. पण प्रश्न असा आहे की, उन्हाळ्यात कॉटन साडी एवढी लोकप्रिय का असते बरं? आणि ती नेसायची योग्य पद्धत कोणती? चला तर मग जाणून घेऊया या विशेष लेखात...

उन्हाळ्यातचं कॉटन साडीचा ट्रेंड का वाढतो?

Advertisement

उन्हाळ्यात तापमान वाढलेलं असतं आणि अशा वेळी जड साड्या नेसणं खूप अवघड होतं.याच कारणामुळे कॉटन साडीला विशेष मागणी असते. कारण कॉटन साडी ही घाम पटकन शोषते, शरीराला थंडावा देते, दिवसभर हलकी आणि आरामदायी वाटते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, साधेपणातही अॅट्रक्टीव्ह दिसते. म्हणूनच ऑफिस असो की लग्न सराई कॉटन साडीचा ट्रेंड नेहमीच असतो.

कॉटन साडी नेसण्याची योग्य पद्धत कशी-

आता प्रश्न हा की, कॉटन साडी नेसण्याची योग्य पद्धत कोणती, थांबा सांगते... कॉटन साडी सुंदर दिसण्यासाठी तिचं नेसणं खूप महत्त्वाचं असतं. सर्वात आधी, साडी नीट इस्त्री करून घ्या, कारण कॉटनमध्ये घड्या पटकन दिसतात.यानंतर पेटीकोट व्यवस्थित बांधा आणि साडीला हलके व नीट pleats म्हणजे निऱ्या घ्या. या निऱ्या जास्त जाड नसाव्यात, कारण त्यामुळे साडीचा लूक बिघडू शकतो.पदर साधा ठेवून खांद्यावर नीट टाका आणि सेफ्टी पिनचा योग्य वापर करा, जेणेकरून साडी दिवसभर व्यवस्थित राहील.....

विविध स्टाईल्सने देखील ती नेसु शकता

1..जर तुम्हाला कॉटन साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही विविध स्टाईल्सने देखील ती नेसु शकता, ज्यामुळे लुक अॅट्रक्टीव्ह वाटेल

2.तुम्हाला पारंपरिक लूक हवा आहे , तर नऊवारी साडी स्टाईल उत्तम पर्याय आहे.

3.जर तुम्हाला elegant आणि royal दिसायचं असेल, तर बंगाली स्टाईल ड्रेपिंग खूप सुंदर दिसते.

4.ऑफिसला जाताना नेसायची असेल तर साधी आणि नीटनेटकी ड्रेपिंग योग्य ठरते, जी प्रोफेशनल लूक देते.

Extra स्टायलिंग टिप्स

1. कॉटन साडीसाठी काही खास Extra टिप्स....

2. अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही छोट्या टिप्स लक्षात ठेवा.

3. हलका आणि कॉटनचा ब्लाऊज निवडा, ऑक्सिडाईज किंवा हलकी ज्वेलरी वापरा, आणि उन्हाळ्यासाठी पेस्टल किंवा हलके रंग निवडा.

4. मेकअपही साधा आणि नैसर्गिक ठेवा, कारण कॉटन साडीची खरी सुंदरता तिच्या साधेपणातच असते.

Advertisement
Tags :

.