For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जाणून घ्या गुणकारी गवती चहाचे फायदे

05:15 PM Aug 08, 2023 IST | Kalyani Amanagi
जाणून घ्या गुणकारी गवती चहाचे फायदे

खूप जण गवती चहा पिणे पसंत करतात. गवती चहा ही अशी वनस्पती आहे ज्यामुळे चहाची चव वाढते. यामुळे बऱ्याच जणांच्या घरी अगदी आवर्जून गवती चहा पितात. पण गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.आज आपण गवती चहा प्यायल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.

Advertisement

गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता, अतिसार आणि सूज येणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी गवती चहा प्रभावी आहे.

गवती चहा वजन कमी करण्यास मदत करतो. त्याचे सेवन केल्यास चयापचय वाढते. विशेष म्हणजे गवती चहाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Advertisement

लिंबू आणि गवती चहा घेण्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म आहेत. जे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करते.

Advertisement

गवती चहामध्ये अ आणि सी जीवनसत्त्वे असतात. हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. हे केस वाढण्यास उपयुक्त आहे.

गवती चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. गवती चहा घेतल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होते.यामुळे पावसाळ्यात गवती चहाचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते.

गवती चहाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.

(टीप - वरील सर्व माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Advertisement
Tags :
×

.