जाणून घ्या बडीशेप खाण्याचे फायदे
बऱ्याच जणांना रोजच्या जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. पचनाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी बडीशेप खाल्ली जाते. पण याव्यतिरिक्त ही बडीशेपमध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.आज आपण बडीशेप खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
बडीशेपमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे ते उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दूर ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही रोज किमान ७ ग्रॅम बडीशेप खाल्ली तर तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता.
बडीशेप खाल्ल्याने स्तनपान करणार्या महिलांना आणि त्यांच्या बाळालाही खूप फायदा होतो. हे आईच्या दुधाचे उत्पादन वाढवते आणि बाळाला चांगले पोषण देण्यास मदत करते.
याशिवाय बडीशेप मध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे, जो सूज कमी करण्यास मदत करतो.
इतकचं नाही तर बडीशेपमध्ये कर्करोगाशी लढणारे घटक असतात जे कर्करोगाचा प्रसार रोखू शकतात.
(वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)