For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लियांडर पेस, विजय अमृतराज ‘इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम’मध्ये

06:55 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
लियांडर पेस  विजय अमृतराज ‘इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम’मध्ये
Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूपोर्ट (अमेरिका)

Advertisement

दिग्गज भारतीय टेनिसपटू लियांडर पेस आणि विजय अमृतराज हे अनेक ऐतिहासिक विजयांचे आणि अनेक पिढ्यांचे नायक राहिलेले असून रविवारी त्यांच्या मुकुटात आणखी एक मानाचे पीस खेवले जाऊन ते ‘इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरले.

51 वर्षीय पेसच्या कामगिरीच्या यादीत 1996 अटलांटा ऑलिम्पिकमधील पुऊष एकेरीतील कांस्य, आठ पुऊष दुहेरी आणि 10 मिश्र दुहेरीतील ग्रँडस्लॅम मुकुट याशिवाय अनेक प्रसिद्ध डेव्हिस चषक विजयांचा समावेश आहे. त्याला खेळाडूच्या श्रेणीमध्ये हा दुर्मिळ सन्मान देण्यात आला आहे.

Advertisement

70 वर्षीय विजय अमृतराज विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनमध्ये पुऊष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रत्येकी दोनदा पोहोचले आणि 1974 आणि 1987 असे दोनदा त्यांनी भारताला डेव्हिस कप फायनलमध्ये पोहोचविले. शिखरावर असताना ते जगात एकेरीत 18 व्या, तर दुहेरीत 23 व्या क्रमांकावर होते. त्यांना रिचर्ड इव्हान्स यांच्यासह ’कंट्रिब्युटर’ श्रेणीमधून ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या तिघांच्या समावेशाने ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट असलेल्या आणि 28 राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दिग्गजांची संख्या 267 वर गेली आहे, असे ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’च्या निवेदनात म्हटले आहे.

पेस दुहेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर 37 आठवडे राहिला होता आणि त्याने एटीपी टूरवर 54 दुहेरी विजेतेपदे जिंकली. टेनिसच्या इतिहासातील दोन्ही गटांमध्ये करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करणाऱ्या तीन पुरुष खेळाडूंपैकी तो एक आहे. कोलकाता येथील पेसने बार्सिलोना (1992) ते रिओ (2016) पर्यंत सलग सात ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला. टेनिसच्या इतिहासातील हा सर्वांत जास्त सहभाग आहे. पुऊषांच्या दुहेरीत महेश भूपतीसोबत जोडी जमविलेला पेस मिश्र दुहेरीत मार्टिना नवरातिलोवा आणि मार्टिना हिंगीस या दोन महान महिला खेळाडूंसमवेत उतरला होता.

1970 साली एटीपी टूरमध्ये उतरलेले अमृतराज बरीच वर्षे भारताच्या डेव्हिस चषक संघातील महत्त्वाचे खेळाडू राहिले होते. डेव्हिस कप फायनलसाठी पात्र ठरलेल्या दोन भारतीय संघांतील ते प्रमुख सदस्य होते. पण 1974 मध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविऊद्ध वर्णभेदाच्या धोरणामुळे अंतिम फेरीत खेळला नाही, तर 1987 मध्ये संघाला स्वीडनकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. निवृत्तीनंतर ते टेनिसच्या प्रसारणाचे चेहरा बनून व्यावसायिक टेनिसच्या विस्तारात मदत करू लागले.

Advertisement
Tags :

.