शहरातील स्मार्ट थांब्यांना गळती
थांबा सोडून अन्यत्र थांबण्याची प्रवाशांवर वेळ : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप
► प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील स्मार्ट बस थांब्यांना गळती लागल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. मागील काही दिवसापासून गोगटे सर्कल येथे उभारण्यात आलेल्या स्मार्ट बसथांब्यात गळती सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना बस थांबा सोडून रस्त्यावर थांबण्याची वेळ आली आहे. स्मार्ट बस थांब्यांच्या देखभालीकडे दुल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.
स्मार्ट सिटी अंतगृ शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बस थांबे उभारण्यात आले आहे. उभारलेले बस थांबे मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. मात्र मनपाकडून स्वच्छता आणि देखभालीकडे दुल होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: वयोवृद्ध, बालक आणि विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू आहे. त्याबरोबर पावसाळ्यात या बसथांब्यामध्ये भटकी जनावरे आसरा घेत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे बस थांबे जनावरांसाठी की प्रवाशांसाठी असा प्रश्नही पडू लागला आहे.
डिजिटल स्क्रीनला फटका बसण्याची शक्यता
शहरातील चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, आरटीओ सर्कल, मार्केट यार्ड, सदाशिवनगर, आदी ठिकाणी लाखो रुपये खर्चून स्मार्ट बस थांबे उभारण्यात आले आहेत. शिवाय प्रवाशांच्या जागृतीसाठी डिजिटल स्क्रीनही बसविण्यात आले आहे. मात्र या बस थांब्यांमध्ये आता पावसाचे पाणी झिरपू लागले आहे. त्यामुळे डिजिटल स्क्रीनला फटका बसण्याची शक्यता आहे.
स्मार्ट बसथांब्यांकडे मनपाचे दुर्लक्ष
शहरात उभारण्यात आलेल्या स्मार्ट बस थांब्यांकडे मनपा प्रशासनाचे दुल झाल्याने परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे बसथांब्यांमध्ये थांबणेही अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे शहरात केवळ नावापुरतीच बसथांबे उभारण्यात आले आहे का? असा प्रश्नही प्रवाशांनी केला आहे. शिवाय बस थांब्यांच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ दोन चार वषृच स्मार्ट बसथांब्यांची दुर्दशा झाली आहे.