कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहापूरच्या जलवाहिनीला गळती

01:53 PM Mar 02, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा : 

Advertisement

नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असतानाच पालिकेच्या शहापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला जकातवाडी येथील जकातवाडी शुद्धीकरण केंद्र ते शहापूर उपसा केंद्र या दरम्यान सहा ठिकाणी मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. ती गळती काढण्यासाठी सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून मंगळवार दि. 4 रोजी आठ तासांचा शटडाऊन आयोजित केला आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला दि. 4 5 रोजी पाणी पुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सातारा नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.

Advertisement

सातारा नगरपालिकेच्यावतीने शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा शहराच्या काही भागाला केला जातो. याच जलवाहिनीला सहा ठिकाणी शहापूर उपसा केंद्र ते जकातवाडी पाणी शुद्धीकरण केंद्र या दरम्यान लागलेली आहे. ही गळती काढण्याचे काम दि. 4 रोजी करण्यात येणार आहे. त्याकरता आठ तास लागणार आहेत. त्यामध्ये पाईपलाईनची गळती काढणे, व्हॉल्व्ह सर्व्हीसिंग करणे इतर मेंटनन्सची कामे करणे या करता दि. 4 मार्च रोजी आठ तास लागणार आहेत. त्यामुळे दि. 4 मार्च रोजी दुपारच्या सत्रातील यशवंत गार्डन टाकीतून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दि. 5 मार्च रोजी सकाळच्या सत्रात शहापुरच्या माध्यमातून होणाऱ्या गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, घोरपडे टाकी, बुधवार नाका टाकी या टाक्यांचे पाणी बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकाद्वारे केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article