महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अधिवेशनाच्या रणनितीसाठी आज विरोधी पक्षीय नेत्यांची बैठक

12:38 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : फेब्रुवारी महिन्यात सुऊ होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती ठरवण्यासाठी आज सोमवारी विरोधी पक्षीय नेते, आमदारांची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात होणार आहे. सायंकाळी होणाऱ्या या बैठकीत विधानसभेत कोणते विषय काढावेत आणि सरकारला कसे धारेवर धरावे, कोडींत पकडावे यावर चर्चा करण्यात येणार आहे. येत्या 2 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुऊ होणार आहे. विधानसभेत काँग्रेस पक्षाचे 3, आपचे 2 तर गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स यांचा प्रत्येकी 1 असे मिळून एकूण 7 विरोधी आमदार आहेत. ते एकत्र आहेत की नाहीत हे आजच्या बैठकीतून समोर येणार असून विधानसभा अधिवेशनातही त्यांची एकी उघड होणार आहे. विविध ज्वलंत प्रश्नावऊन सरकारला जाब विचारण्याचे तसेच कोंडीत पकडण्याचे मनसुबे तयार करण्यात येणार असून सरकारला धारेवर धरण्याचे ठरवण्यात येणार आहे. नवीन वर्षे 2024 मधील हे पहिले अधिवेशन असून त्याची सुऊवात राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने होणार आहे. पणजी स्मार्ट सिटीचे काम व इतर महत्वाचे मुद्दे सरकारला धारेवर धरण्यासाठी काढण्यात आले असून प्रत्यक्षात विधानसभेत काय होते ते नंतर दिसणारच आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article