LCB ची धडक कारवाई, 4 जिह्यातील गांजा रॅकेट उद्धस्त, 8 जणांना अटक
इचलकरंजी, सांगली, सातारा परिसरात कारवाई, आठ जणांना अटक
कोल्हापूर : कोल्हापूरसह, सांगली, सातारा आणि सोलापूर परिसरातील गांजाचे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उद्धस्त केले. इचलकरंजी, सांगली, सातारा परिसरात कारवाई करुन आठ जणांना अटक करुन तब्बल 41 किलो गांजा, चार वाहने, 10 मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दिपक दत्तात्रय पुजारी (वय 37 रा. सांगली नाका इचलकरंजी), विवेक मेघदुत शिंदे (वय 28 रा. मंगळवार पेठ, गांधी पुतळा, इचलकरंजी), अंकुश प्रताप शिंदे (वय 30), नंदकिशोर भिकु साठे (वय 30 दोघे रा. रा.बामणी ता. खानापूर जि. सांगली) यांच्याकडून 21 किलो 70 ग्रॅम गांजा, गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली 1 महिंद्रा बोलेरे, 1 बुलेट, 5 मोबाईल हॅडसेट व रोख रक्कम 16 लाख रुपये जप्त करण्यात आला.
खरसुंडी (ता. आटपाडी) येथून मनोज मदन गोसावी (वय 29 रा. महादेव नगर, अकलुज ता. माळशिरस), राजु अमिन शेख (वय 30 रा. कृष्णप्रियानगर अकलुज ता. माळशिरस), महेश जम्मु साळुंखे (वय 32 रा. खरसुंडी ता. आटपाडी) यांना ताब्यात घेतले. तर सातारा दहिवडी येथून देवदास महादेव तुपे (वय 21 रा. पालवण , ता. दहिवडी) याला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून 20 किलो 125 ग्रॅम गांजा, वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली कार, पाच मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे 14 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना हातकणंगले ते कुंभोज रोडवर नेज गावाच्या हद्दीत