लायज, रॉजर्स, जिमखाना, नीना विजयी
हनुमान चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित हनुमान चषक 14 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांतून लायाज क्रिकेट अकादमीने एमसीसी संघाचा तर रॉजर्स अकादमीने आनंद क्रिकेट अकादमीचा, नीनाने बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा, युनियन जिमखाना अ ने प्रमोद पालेकर संघाचा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. यश चौगुले, जतीन दुर्गाई, किसन पाटील, महम्मद हमजा यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिनडेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लायाज अकादमीने प्रथफ फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी बाद 204 धावा केल्या. विनायक शानुरकरने 38, स्वयंम खोतने 39, विराज पाटीलने 26, वेदांतने 20 तर यश चौगुलेने 15 धावा केल्या. एमसीसीतर्फे सुजितने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीने 25 षटकात 9 गडी बाद 66 धावाच केल्या. त्यात प्रितमने 20 तर आकिबने 11 धावा केल्या. लायाजतर्फे यश चौगुलेने 3-3 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथफ फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 130 धावा केल्या. त्यात आकाश देसूरकरने 29, अद्वैत चव्हाणने 23, प्रज्योत 21 तर समर्थने 12 धावा केल्या. रॉजर्सतर्फे जितिन दुर्गाईने 11-3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स क्रिकेट अकादमीने 15 षटकात 2 गडी बाद 88 धावा केल्या असता पावसाने हजेरी लावल्याने सरासरी धावसंख्येच्या जोरावर रॉजर्स संघला विजयी घोषित करण्यात आले. रॉजर्सतर्फे अवनिश हट्टीकरने 35, प्रसन्नाने 26 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथमफलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 153 धावा केल्या. त्यात सचिनने 51, दर्शने 34, लक्षने 25 तर इम्तियाजने 19 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना संघाने 25 षटकात 5 गडी बाद 154 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात अर्कसनने 49, अजयने 20 तर समर्थने 20 धावा केल्या. बीएससीतर्फे ओम बाणीने 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 3 गडी बाद 261 धावा केल्या. त्यात महम्मद हमजाने 80, अनिषने 51, आर्यन व शाहरुखने प्रत्येकी 37 धावा केल्या. प्रमोद पालेकरतर्फे संजयने प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रमोद पालेकर संघाचा डाव 14 षटकात सर्वगडी बाद 65 धावांत आटोपला. अवनिशने 29 धावा केल्या. जिमखानातर्फे अतिथ भोगणने 3 गडी बाद केले.