For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारिवडे येथील लक्ष्मी तळवणेकर यांचे निधन; हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या 85व्या वर्षी निधन

कारिवडे येथील लक्ष्मी तळवणेकर यांचे निधन  हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या 85व्या वर्षी निधन
Advertisement

ओटवणे : कारिवडे येथील लक्ष्मी विष्णू तळवणेकर (85) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Advertisement

लक्ष्मी तळवणेकर या मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावासाठी परिचित होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि तळवणेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. बुधवारी दुपारी कारिवडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्या माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांच्या वहिनी होत. भाजपाचे कारिवडे शक्तिकेंद्रप्रमुख आनंद तळवणेकर आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन तळवणेकर यांच्या त्या मातोश्री, तर कारिवडेच्या माजी सरपंच अपर्णा तळवणेकर यांच्या सासू होत.

Advertisement

त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली, दीर, नणंद, सुना, जाऊ, पुतणे, नातवंडे, पतवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.

Advertisement

.