For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्बाब्वे दौरा, आशियाई स्पर्धेसाठी लक्ष्मण यांच्याकडे जबाबदारी

06:22 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
झिम्बाब्वे दौरा  आशियाई स्पर्धेसाठी लक्ष्मण यांच्याकडे जबाबदारी
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर आणि गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांच्यासह भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौरा आणि जपानमधील आयची नागोया येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ‘सपोर्ट स्टाफ’ची धुरा सांभाळतील.

इंग्लंडविरुद्धच्या ‘व्हाईट बॉल’ (मर्यादित षटकांच्या) मालिकेनंतर वरिष्ठ राष्ट्रीय संघाच्या सपोर्ट स्टाफला थोडी विश्रांती मिळावी, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. भारत 23, 25 आणि 27 जुलै रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. 19 जुलै रोजी इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी हा दौरा सुरू होईल. लक्ष्मण आणि त्यांचे साहायक पथक आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय संघाचे कामकाज पाहतील. याच काळात वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची मायदेशात व्हाईटबॉल मालिका होणार असून त्यावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे एकदिवशीय संघासोबत असतील.

Advertisement

भारतीय संघाच्या दुसऱ्या फळीतील संघाची जबाबदारी लक्ष्मण यांच्याकडे सोपविण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2024 मध्ये जेव्हा शुभमन  गिल कर्णधार होता आणि अभिषेक शर्माने पदार्पण केले होते, तेव्हा झिम्बाब्वे दौऱ्यावर त्यांनीच प्रशिक्षक पथकाचे नेतृत्व केले होते. तसेच 2023 मध्ये हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतही ते मुख्य प्रशिक्षक होते. त्यावेळी राहुल द्रविड हे एकदिवशीय विश्व़चषकासाठी वरिष्ठ संघासोबत होते.

Advertisement
Tags :

.