For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना व्हीजेएनटी सेल सावंतवाडी उप-तालुका प्रमुखपदी लक्ष्मण भालेकर

शिवसेना व्हीजेएनटी सेल सावंतवाडी उप तालुका प्रमुखपदी लक्ष्मण भालेकर
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : शिवसेनेच्या ओबीसी व्हीजेएनटी सेलच्या सावंतवाडी उप तालुका प्रमुख पदी कारिवडे येथील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण भालेकर यांची निवड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याहस्ते लक्ष्मण भालेकर यांना निवड पत्र देण्यात आले.
शिवसेनेच्या ओबीसी व्हीजेएनटी सेलचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मान्यतेने शिवसेनेच्या ओबीसी व्हीजेएनटी सेलच्या सावंतवाडी उप तालुका प्रमुख पदी लक्ष्मण भालेकर यांची निवड केली आहे. यावेळी लक्ष्मण भालेकर यांनी या पदाच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल लक्ष्मण भालेकर यांचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल लक्ष्मण भालेकर यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.