निवृत प्राथमिक शिक्षक लक्ष्मण बागवे यांचे निधन
ओटवणे प्रतिनिधी
कसाल गांगुची राई येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक लक्ष्मण देऊ बागवे (९६) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत बागवे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डोंबिवली येथील निवृत्त शिक्षक विवेकानंद बागवे, सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्राध्यापक सतीश बागवे, मुंबई येथील अभियंता मानसी कासले, शिरगाव आयटीआयचे शिक्षक दीपक बागवे, कसाल येथील डॉ भालचंद्र बागवे, रामगड प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अंकिता वळंजू, आरोस कॉलेजचे मुख्याध्यापक नितिन बागवे, बांदा नवभारत कॉलेजच्या शिक्षिका मिलन वसकर यांच्या त्या मातोश्री तर निवृत्त शिक्षक रामचंद्र बागवे यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, तीन मुली, सुना, एक भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.