महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली विमानतळावर सुरक्षेत ढिसाळपणा उघड

06:22 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मद्यधुंद व्यक्ती धावपट्टीवर पोहोचल्याने खळबळ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे.  एका मद्यधुंद व्यक्तीने सीमा ओलांडून धावपट्टीपर्यंत धडक मारल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. पार्किंगच्या क्षेत्रात विमानाला मार्गदर्शन करणाऱ्या वैमानिकाला सदर व्यक्ती निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीला त्यासंबंधी माहिती दिली. यानंतर सीआयएसएफने अटकेची कारवाई करत पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 27 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती सोमवारी विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था असताना विमानतळावरच सुरक्षेतील ढिसाळपणा समोर आला आहे. याप्रकरणी संबंधिताला अटक करण्यात आली असून सदर व्यक्ती अमली पदार्थांचे व्यसन करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच संबंधित व्यक्ती हरियाणातील नूह येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article