प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा उबाठाकडून सत्कार
कोल्हापूर
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही. संशयित प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा उबाटाकडून सत्कार करण्यात आला. अॅड. अमितकुमार भोसले यांचा शिवसेना (उबाठी) च्यावतीने सत्कार करण्यात आला.
"शिवभक्त, शिवप्रेमी आणि शिवसैनिकांच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कायमच आक्रमक भावना आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही. तरीही कोणी अवमान करण्याचा प्रयत्न केला, तर हीच प्रतिक्रिया आमची असेल. ही तर सुरुवात आहे. कोरटकर या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या घरात घुसुन त्याला मारतो, अशा भावना व्यक्त केल्या, हे आम्ही सहन करणार नाही. कोरटकरने भविष्यात पुन्हा काही बोलताना विचार करावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर यांचा अवमान करा, त्यांना कमी लेखा. जेणेकरून भविष्यात लोक यांची नावे विसरली पाहिजेत. असे राजकारण हे भाजप सरकार करत आहेत. यासाठी भाजपने पिल्लावळ निर्माण केली आहे. परंतु भविष्यात नाही, तर पुढचे ५००, हजार वर्ष झाले तर आम्ही त्यांना विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहेत. हे राजकारण असंच सुरु राहीलं, तर एक अमितकुमार भोसले नाही तर भविष्यात हजारे अमितकुमार भोसले तयार होतील. म्हणून शिवसेना (उबाठा) या पक्षाच्या वतीने आम्ही अॅड. अमितकुमार भोसले, या लढाऊ बाण्याचा शिवभक्ताचा सत्कार केला आहे", अशी प्रतिक्रिया यावेठी शिवसेना (उबाठा) चे जिल्हा उपनेते संजय पवार यांनी व्यक्त केली.