For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायालयाच्या आवारातच वकीलाला पक्षकाराकडून धमकी

04:48 PM Nov 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
न्यायालयाच्या आवारातच वकीलाला पक्षकाराकडून धमकी
Advertisement

संबंधितावर अदखलपात्र गुन्हा ; कडक कारवाईची सावंतवाडी वकील संघटनेची मागणी

Advertisement

सावंतवाडी
\ प्रतिनिधी

पक्षकाराकडून एका ज्येष्ठ वकीलाला न्यायालयाच्या आवारातच धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला असून याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान असे प्रकार राज्यात रोज घडत आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन याप्रकरणी न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन धमकी देणाऱ्या संबंधितांच्या विरोधात कायद्यातील तरतुदीचा वापर करून न्यायालयाकडे त्या गुन्ह्याचा तपास करण्याची परवानगी मागण्यात यावी, अशी मागणी वकील संघटनेच्या वतीने आज सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन वकील संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, राॅनी जॉन डान्टस नावाच्या व्यक्तीने वकील यांना न्यायलात धमकी दिली, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संबंधितावर न्यायाधीन तरतुदी नुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वकील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बालाजी रणशुर, ज्येष्ठ वकील दिलीप नार्वेकर, श्रीनिवास गवस, शामराव सावंत, संदीप निंबाळकर, नीलिमा गावडे, अजित राणे, विजय शंभरकर, संतोष गावडे, सुखानंद सावंत, सुमित सुकी, पूजा ओटवणेकर, सिद्धी परब, रामानंद बावकर, राहुल मडगावकर, प्रितेश सावंत, राहुल पै, गौरव केसरकर, वर्षा गोरे, स्वप्निल कोलगावकर, माधवी पेंडुरकर, प्रतीक्षा भिसे, संकेत नेवगी आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.