For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur news | कोल्हापुरात वकिलासह त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण; कार पार्किंगच्या किरकोळ कारणावरून राडा

01:38 PM Apr 26, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापुरात वकिलासह त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण  कार पार्किंगच्या किरकोळ कारणावरून राडा
Advertisement

                              कोल्हापुरात पार्किंगच्या वादातून मारहाण;

Advertisement

कोल्हापूर -रस्त्यावर मोटार उभी केल्याच्या कारणातून बकिलास त्याच्या कुटूंबास तिघांबर गुन्हा दाखल करण्यात आला. कसबा बावड्यातील रेणुका मंदिराजवळ गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी धनराज बाडकर (रा. गंगा भाग्योदय कार्यालयनजीक) याच्यासह तीन साथीदारांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्यासुमारास एक वकिल कुटूंबियांसोबत कसबा बावडा येथील नव्याने सुरु झालेल्या मॉलमध्ये खरेदीसाठी आले होते. त्यांनी न्याय संकुलाजवळील गंगा भाग्योदय कार्यालयासमोरील रस्त्यावर मोटार उभी केली होती. यावेळी संशयित धनराज बाडकर आणि त्याचे तीन साथीदार आले. मोटार कार्यालयासमोरील रस्त्यावर असल्याच्या कारणातून वकीलास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वकिलाला मोटारीतून बाहेर बोलावून मारहाण केली. धनराज बाडकर याने हातातील कड्याने वकिलाच्या नाकाबर आणिचेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावला.

Advertisement

यामध्ये वकीलाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून वकिलाची पत्नी व मुलगा मोटारीतून उत्तरले. यावेळी संशयितांनी वकिलाच्या पत्नीलाही बाजूला फरफटत नेले. झटापटीत त्यांच्या बोटांना दुखापत झाली. एका संशयिताने वकीलांच्या पत्नीस अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. बकीलाने खासगी रुग्णालयात उपचार घेऊन याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

Advertisement
Tags :

.