महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लॉरेन्स गँगची कमान अनमोल बिश्नोईकडे

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अटकेतील संशयितांच्या चौकशीतून माहिती उघड

Advertisement

वृत्तसंस्था/चंदीगड

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगची धुरा आता त्याचा धाकटा भाऊ अनमोल याने हाती घेतली आहे. मुंबईतील सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासात ही बाब समोर आली आहे. अनमोल हा लॉरेन्सचा धाकटा भाऊ असून तो लॉरेन्स गँगमधील नवीन कार्यकर्त्यांची भरती आणि मोठ्या घटनांच्या नियोजनावर वैयक्तिकरित्या देखरेख ठेवत असतो. तसेच मोबाईल अॅपद्वारे तो नेमबाजांच्या संपर्कात राहत असल्याची माहिती अटकेतील संशयितांच्या चौकशीतून पुढे आली आहे. गेल्या काही दिवसात तपास अधिकाऱ्यांनी बिश्नोई गँगशी संबंधित 10 जणांना अटक केली असून त्यांच्या मोबाईलवरून अनेक बाबी उघड झाल्या आहेत.

यापूर्वीही सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या प्रकरणात आरोपीने अनमोलशी स्नॅपचॅटवर बोलल्याचे कबूल केले होते. अनमोल बिश्नोई हाच टोळीतील गुडांना आदेश देत असल्यामुळे एनआयएने त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. भानू या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनमोल बिश्नोईविऊद्ध पंजाबमधील अबोहर येथे 2012 मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात प्राणघातक हल्ला आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांचा समावेश होता. 2015 पर्यंत पंजाबमध्ये अनमोलवर अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल झाले होते. जोधपूर तुऊंगात असताना अनमोलने खंडणीच्या धमक्मया देण्यास सुऊवात केल्यापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. आजही आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याने गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article