स्थुलत्वावर येणार कायदा, वजन वाढल्यास दंड
मोजली जाणार कर्मचाऱ्यांची कंबर
माणसाची लाइफस्टाइल पूर्वीच्या तुलनेत अत्यंत वेगाने बदलली आहे. आता आम्ही सकस आहाराऐवजी अधिक भर पोट भरण्यावर देत आहोत. कधी चवीच्या नादात पडून तर कधी घाईगडबडीत आम्ही जंक फूड खात असतो. त्यावेळी आम्हाला फारसा फरक पडत नाही, परंतु हीच लाइफस्टाइल अधिक दिवसांपर्यंत फॉलो केल्यास शरीराला पोषक घटक कमी प्रमाणात प्राप्त होतात आणि स्थुलत्व वाढू लागते.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून वजन वाढणे कुठल्याही प्रकारे चांगले नाही, परंतु यावर आतापर्यंत कुठलाच कायदा निर्माण करण्यात आला नव्हता. पण आता युनायटेड किंगडम स्थुलत्वाच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. स्थुलत्वाशी झगडणाऱ्या देशांमध्ये जपान, अमेरिका आणि ब्रिटन सर्वात पुढे आहेत. प्रत्येक देश स्वत:च्या हिशेबानुसार या स्थितीला सामोरा जात आहे, परंतु युनायटेड किंगडमने एक नवी पद्धत शोधून काढली आहे.
शाळांपासून ऑफिसपर्यंत माणसाने स्वत:च्या कंबरेच्या आकारावर लक्ष द्यायला हवे. कुठल्याही कंबेरचा आकार त्याच्या उंचीच्या निम्म्यापेक्षा कमी असावा. 45-74 वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या कंबरेचा आकार मोजला जावा. कर्मचाऱ्यांच्या कंबरेचा आकार अधिक असल्यास त्यांना नियुक्तीदारांकडून 3 महिन्यांपर्यंत वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जावे. जर कर्मचाऱ्यांची वेस्टलाइन वाढल्यास याला याचा दंड नियुक्तीदाराकडे भरावा लागतो असे युनायटेड किंगडमच्या नॅशनल ओबेसिटी फोरमचे टॅम फ्राय यांनी जपानच्या मेटाबो लॉविषयी बोलताना म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये वाढतेय स्थुलत्व
युनायटेड किंगडमच्या हाउस ऑफ कॉमन्स लायब्रेरीनुसार 4-5 वर्षांच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक मुले स्थुलत्वाच्या समस्येला तोंड देत आहेत. तर 10-11 वयोगटातील 23.4 टक्क्यांहून अधिक मुलांचे वजन वाढलेले आहे. 1990 पासून आतापर्यंत महिलांच्या कंबरेच्या आकारात 3 इंचाची सरासरी वाढ झाली आहे. अशा स्थितीत ब्रिटन देखील जपानच्या नियमाकडून प्रेरणा घेऊ इच्छितो. या नियमामुळे जपानला मोठा लाभ झाला आहे.