महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोमुनिदादच्या जमिनीवरील घरांसाठी कायदा

12:15 PM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : नौदल परवानगीची समस्याही सुटणार,वास्कोत रेल्वे उ•ाण पुलाची पायाभरणी

Advertisement

वास्को : कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर घरे कोमुनिदाद कायद्यात बदल करून कायदेशीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी दिले. त्याचबरोबर घर बांधकामासाठी लागणारा नौदलाचा परवाना आणि हवाई क्षेत्रातील घरांच्या उंचीचा प्रश्नही केंद्रीय संरक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर सुटेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. वास्कोतील नवेवाडे व शांतीनगर या दोन भागांना जोडणारा रेल्वे उड्डाण पुल उभारण्यात येणार असून या पुलाच्या पायाभरणी समारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते पुलाच्या पायाभरणी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. या उड्डाण पुलाचे काम आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

Advertisement

विधानसभेत कायदा करणार

कोमुनिदादीच्या जमिनीवरील घरांचा प्रश्न सोडवला जाणार आहे. या घरांचे नियमितीकरण होणार आहे. घरे कायदेशीर करण्यासाठी विधानसभेच्या येत्या अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार असून कोमुनिदाद कायद्यात बदल करून नवीन कायदा करण्यात येईल. कोमुनिदाद जमिनीवरील कुटुंबांमध्ये आपली घरे पाडली जाणार असल्याची भिती आजही आहे. मात्र, तसे होऊ शकत नाही, असे सांगून अशा घरांना संरक्षण देण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. या समारंभाच्या व्यासपीठावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, कदंब वाहतूक महामंडळाचे उपाध्यक्ष क्रितेश गांवकर, नगसेविका श्रद्धा महाले, नगरसेवक विनोद किनळेकर, दाबोळी भाजपा मंडळ अध्यक्ष संदीप सूद, दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी, नगरसेवक, पंच सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘डबल इंजिन’मुळे विकास शक्य

मुख्यमंत्र्यांनी दाबोळी मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांचा उल्लेख करून मंत्री गुदिन्हो यांचे अभिनंदन केले. पायाभरणी करण्यात आलेला रेल्वे उड्डाण पुल राज्य सरकार, रेल्वे विकास निगम लिमिटेड तसेच दक्षिण पश्चिम रेल्वे यांच्याकडून संयुक्तरीत्या उभारण्यात येत असून या प्रकल्पासाठी बारा कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुश गोयल यांनी दाबोळीतील प्रकल्पांसाठी 36 कोटींचे अर्थसहाय्य केलेले आहे. इथली विकासकामे डब्बल इंजिन सरकारमुळेच शक्य झालेली आहेत, असे ते म्हणाले.

दोन्ही विमानतळांवर सुरळीत व्यवसाय

मोपा विमानतळामुळे दाबोळी विमानतळ बंद पडेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सध्या दोन्ही विमानतळांवर व्यवसाय सुरळीत आहे. कुणीच घाबरण्याची गरज नाही हे आपण पूर्वीच सांगितले होते.

नौदल परवानगीची समस्या सुटणार

वास्को व दाबोळी भागात घरे बांधकामासाठी नौदलाची लागणारी परवानगी आणि हवाई क्षेत्रातील घरांच्या उंचीचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार आहे. यासंबंधी केंद्रीय स्तरावर बैठका झालेल्या आहेत. शेवटची बैठक केंद्रीय संरक्षणमंत्र्यांसोबत होणार असून हा प्रश्न सोडवला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपले सरकार मुंडकारांचेच

स्वत:च्या जमिनीवरील घर नियमित करण्यासाठी घरमालकांना दिलेल्या संधीबाबत घरमालक अद्याप जागरूक नसल्याचे दिसत असून त्यांनी योग्य सोपस्कर करावेत तसेच भाटकारांच्या जमिनीवर राहणाऱ्यांनीही मुंडकार म्हणून कायदेशीर सोपस्कर करावेत. त्यांना सनदा देण्यात येतील. आपले सरकार मुंडकारांचेच आहे. सामान्य जनतेचे हे सरकार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कायदा करणे गरजेचेच : गुदिन्हो

मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्र्यांनी कोमुनिदादीच्या जमिनीवरील घरे कायदेशीर करण्याच्या दिलेल्या आश्वासनाबद्दल समाधान व्यक्त केले. गेली अनेक दशके ही कुटुंबे या जमिनीवर घरे बांधून राहत आहेत. त्यांची ती गरज होती. आता ती कायदेशीर करण्यासाठी कायदा करणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे सामान्य कुटंबांना फार मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले. दाबोळी मतदासंघात नवीन उड्डाण पुल उभारण्यात येत असल्याने स्थानिक लोकांची फार मोठी सोय होणार आहे. यापूर्वीही महामार्गावर दोन उड्डाण पुल उभारण्यात आलेले असून केंद्र सरकारची मदत लाभल्याचे ते म्हणाले. या पुलाबरोबरच नवेवाडेतील रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. सौंदर्यीकरण होणार आहे. लोकांच्या सहकार्यानेच हे होणार नाहे. लोकांनी थोडा त्याग करण्याची तयारीही ठेवावी, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article