लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींनी साधला तृतीयपंथीयांची संवाद
सातारा :
जागतिक महिला दिनानिमित्त येथील इस्माईल साहेब मुल्ला विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी सिद्धी संजय जाधव, अस्मिता हिंदुराव अवघडे, प्रियंका मनीष चव्हाण, साधना शशिकांत माने, श्रीनाथ सुदाम साळुंखे आणि आरती नामदेव केंजळे यांनी तृतीयपंथी असलेल्या प्रणिता उर्फ प्रशांत प्रकाश वाडकर तसेच अमृता यांच्याशी संवाद साधला.
तृतीयपंथीयांच्या सामाजिक समस्या तसेच दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना येण्ाया अडचणी यावर चर्चा करण्यात आली. प्रकाश वाडकर या जिल्हा न्यायालय तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या पदाधिकारी असून मानवी हक्क व शासनाची भूमिका याबाबत ते कार्य करत असतात.
तृतीयपंथीयांच्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न म्हणजे सार्वजनिक स्वतंत्र स्वच्छता गृह, रुग्णालयात स्वतंत्र बेड व्यवस्था, दत्तक वारस निवृत्तीवेतन, स्वतंत्र आरक्षण, प्रवासी सवलती, विमा संरक्षण, कर्जपुरवठा इत्यादीसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ज्याप्रमाणे समाजामध्ये महिलांना आदरपूर्वक सन्मान दिला जातो तसेच स्वतंत्र अधिकार दिलेले असतात त्याचप्रमाणे तृतीयपंथीयांना देखील अधिकार शासनाकडून मिळणे गरजेचे आहे. सदर प्रसंगी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तृतीय पंथीयांना शुभेच्छा देऊन त्यांच्या मागण्याबाबत जनजागृती करण्याचे आश्वासन दिले.