For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कायदा सुव्यवस्था राखली जाईल

01:10 PM Sep 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
कायदा सुव्यवस्था राखली जाईल
Advertisement

पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला हा गंभीर दखल घेण्यासारखा आहे. या घटनेबाबत पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत सरकारनेही सूचना केलेल्या आहेत, अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सरकारमार्फत नक्कीच कायदा सुव्यवस्था राखली जाईल, असे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या घटनेने संपूर्ण गोवा हादरलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल राजू यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सर्व चौकशी केली जाईल. याबाबत सरकारनेही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पाऊले उचलली असून, संशयित मारेकऱ्यांना अटक केली असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.