लावाचा विराट व्ही 1 प्रो स्मार्टफोन लाँच
6000 एमएएच बॅटरी, 50 एमपीचा कॅमेरा असणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतात लावाने आपला विराट सिरीजअंतर्गत नवा स्मार्टफोन विराट व्ही 1 प्रो हा 5जी स्मार्टफोन लाँच केला आहे. विराट सिरीजअंतर्गत व्ही 1 व व्ही 1 5 जी बाजारात आल्यानंतर एक महिन्यातच नवा फोन कंपनीने सादर केला आहे. चांगला कॅमेरा, चांगली बॅटरी व इतर वैशिष्ट्यो यात समाविष्ट आहेत.
या फोनमध्ये टी 8200 प्रोसेसर, 6000 एमएएच बॅटरी अशा सुविधा असतील. लावाचा विराट व्ही 1 प्रो हा 5जी स्मार्टफोन 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या पर्यायासह येणार आहे. याची विक्री फ्लिपकार्टवर 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. सिक्कीम मिडनाइट व स्पिती फ्रॉस्ट या दोन रंगात हा फोन येणार असून याची किमत 15,999 रुपये इतकी असणार आहे. सुरवातीला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार असल्याचे समजते.
इतर वैशिष्ट्यो
विराट व्ही 1 प्रो हा 6.74 इंचाच्या एचडी प्लस एलसीडी डिस्प्लेसह येणार असून युनिसॉक टी 8200 प्रोसेसर दिला गेला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवण्याची सोय आहे. कॅमेराचा विचार करता 50 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर कॅमेरा दिला गेला आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
लावाने आपल्या या फोनमध्ये ब्लोटवेअर फ्री क्लीन युआयची सोय ठेवली आहे. आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 16 वर चालणारा हा फोन 2 वर्षाच्या सेक्युरिटी अपडेटसह असेल. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6000 एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. सोबत 18 डब्ल्यूचा फास्ट चार्जरही मिळणार आहे.
वैशिष्ट्य
? युनिसॉक टी 8200 प्रोसेसर
? 6000 एमएएचची बॅटरी
? 6 जीबी रॅम व
128 जीबी स्टोरेज
? बँक कार्डवर 2 हजारांची सवलत
? 6.74 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले
? व्हॉटसअप चॅटिंग, व्हिडीयो
व गेमिंगसाठी उत्तम
? मायक्रोएसडी कार्डसोबत 1 टीबीपर्यंत स्टोरेजची सोय
? 50 मेगापिक्सलचा दमदार
कॅमेरा, 8 एमपीचा प्रंट कॅमेरा
? 2 के रेझोल्युशनचा व्हिडीओ रेकॉर्डची सुविधा
? आऊट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 16 वर आधारीत