For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लावा युवा’ 5-जी स्मार्टफोन सादर

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘लावा युवा’ 5 जी स्मार्टफोन सादर
Advertisement

सुरुवातीची किंमत 9,499 रुपये :  5000 एमएएचची बॅटरी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

स्मार्टफोन निर्माता लावाने आपला लावा युवा 5 जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 30 मे रोजी कंपनीने हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. 4जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज प्रकारातील फोनची किंमत 9,499 रुपये आहे आणि 4जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. अत्यंत परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन सादर करण्यात आला असून याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळू शकतो. या फोनमध्ये 6.5-इंचाचा 2.5 डी वक्र आयपीएस डिस्प्ले आहे. डिस्प्ले 90 एचझेड रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये मॅट फिनिशसह गोल-आकाराचा कॅमेरा आहे.

Advertisement

अन्य फिचर्स :

  • तपशील डिस्प्ले: लावा युवा 5 जी स्मार्टफोनमध्ये 720 ते 1600
  • पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच 2.5 डी वक्र डिस्प्ले आहे.
  • प्रोसेसर: स्मार्टफोन अँड्रॉईड 13 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलसीडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे.
Advertisement
Tags :

.