लावाचा स्मार्ट 4 प्लस बजेट स्मार्टफोन लाँच
चेन्नई :
लावा इंटरनॅशनल यांनी आपला बजेटमधील स्मार्टफोन स्मार्ट 4 प्लस हा नुकताच बाजारात लॉन्च केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये इतकी परवडणारी असणार आहे.
सदरचा स्मार्टफोन हा लावाच्या रिटेल आउटलेटवर विक्रीकरीता उपलब्ध होणार आहे. स्मार्ट 4 प्लस हा स्मार्टफोन 6.75 इंचाच्या एचडी प्लस डिस्प्लेसह येणार असून युनिसॉक 9863 ए ऑक्टा कोअर प्रोसेसरने युक्त असणार आहे. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसह येणार आहे. या स्मार्टफोनला 5000 एमएएचची बॅटरी असणार असून 10 डब्ल्यूचा चार्जर असणार आहे. 13 मेगापिक्सल एआय ड्युअल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. अँड्रॉइड 15 वर हा स्मार्टफोन चालणार असून दोन वर्षाचे सेक्युरिटी अपडेट यासोबत मिळेल. पाणी आणि धूळरोधक असा हा स्मार्टफोन असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.