For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाव्हाचा नवा ‘युवा 4’ स्मार्टफोन लाँच

07:00 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
लाव्हाचा नवा ‘युवा 4’ स्मार्टफोन लाँच
Advertisement

7 हजार रुपये असणार किंमत : 50 एमपीचा कॅमेरा

Advertisement

नवी दिल्ली  : भारतीय स्मार्टफोन कंपनी लाव्हा यांनी आपला युवा 4 हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याची किंमत 7 हजार रुपयांच्या घरात राहणार आहे. सदरचा 4 जी स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी प्लस डिस्प्लेसह येणार असून याला 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असणार आहे. ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी ब्लॅक या तीन रंगात हा फोन येणार असून 4 जीबी रॅम व 64 जीबी तसेच 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या पर्यायासह येईल. फोनची किंमत 6999 रुपये इतकी असणार आहे. युएनआयएसओसी टी606 चिप यात असणार असून 5000 एमएएचही दमदार बॅटरीही दिली गेली आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असणार असून अँड्रॉइड 14 वर चालणार आहे. 1 वर्षाची वॉरंटी फोनवर दिली जात असून सिंगल स्पीकर यात दिला जाईल.

वैशिष्ट्यो पाहुयात...

Advertisement

  • डिस्प्ले-6.56 इंचाचा एचडी प्लस
  • प्रोसेसर-युएनआयएसओसी टी606
  • रॅम- 4जीबी (8 जीबीपर्यंत वाढवता येणार)
  • स्टोरेज-64 जीबी/128 जीबी
  • रिअर कॅमेरा- 50 एमपी
  • फ्रंट कॅमेरा-8 एमपी
  • बॅटरी-5000 एमएएच
  • चार्जिंग-10 डब्ल्यू वायर्ड
  • ऑपरेटिंग सिस्टम-अँड्रॉइड 14
  • इतर वैशिष्ट्यो- साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, सिंगल स्पीकर, 1 वर्षाची वॉरंटी
  • रंग- ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी पर्पल, ग्लॉसी ब्लॅक
Advertisement
Tags :

.