लॉरियस क्रीडा पुरस्काराचे माद्रीदमध्ये पुनरागमन
वृत्तसंस्थ / माद्रीद (स्पेन)
जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा समजलेल्या जाणाऱ्या लॉरियस विश्व क्रीडा पुरस्काराचे माद्रीदमध्ये तब्बल 25 वर्षानंतर पुनरागमन होत आहे. आता लॉरियस विश्व क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ 21 एप्रिलला माद्रीदमध्ये आयोजित केला आहे.
2000 साली पहिल्या लॉरियस विश्व क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ मोनॅकोमध्ये झाला होता. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनंतर हा पुरस्कार वितरण समारंभ स्पेनमधील माद्रीद येथे होत आहे. जगातील जवळपास 40 देशांच्या खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेत लॉरियस विश्व पुरस्कार दिला जातो. गेल्यावर्षी माद्रीदमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेल्या ठिकाणीच येत्या एप्रिलमध्ये लॉरियस विश्व क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रसारण पुरस्कार समारंभामध्ये स्पेनचे सीमोनी बिलेस, ज्युडे, बेलिंगहॅम आणि सर्बियाचा टेनिसपटू जोकोविच हे विजेते ठरले होते. ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील पाच फुटबॉल क्लब, टेनिसक्षेत्रात माद्रीद खुली टेनिस स्पर्धा तसेच इस्पेनातील सायकलिंगचे ठिकाण ही माद्रीदमधील महत्त्वाची क्रीडा ठिकाणे आहेत. माद्रीदमध्ये एप्रिल महिन्यात होणाऱ्या या पुरस्कार वितरण समारंभावेळी माद्रीद शहरातील सहकार क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे.