For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सुपर आय’ उपग्रह-3 चे होणार प्रक्षेपण

06:22 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सुपर आय’ उपग्रह 3 चे होणार प्रक्षेपण
Advertisement

अंतराळाच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारत अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेणार आहे. बेंगळूर येथील खासगी स्पेस स्टार्टअप गॅलेक्सी आय स्पेस रविवारी स्वत:चा अत्याधुनिक उपग्रह मिशन दृष्टी प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे अंतराळात पाठविला जाणार आहे. भारताच्या खासगी कंपनीकडून निर्मित हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे.

Advertisement

आतापर्यंत बहुतांश उपग्रह  एक तर ऑप्टिकल कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे टिपत होते किंवा रडार तंत्रज्ञानाद्वारे. ऑप्टिकल कॅमेरे मोबाइल कॅमेऱ्याप्रमाणेच साफ छायाचित्रे उपलब्ध करतात. परंतु ढग किंवा रात्रीच्या वेळी ते उपयुक्त ठरत नाहीत. तर रडार तंत्रज्ञान अंधार आणि ढगांच्या पार पाहू शकते, परंतु त्याची छायाचित्रे तितकी साफ नसतात.

मिशन दृष्टीमध्ये पहिल्यांदा दोन्ही तंत्रज्ञानांना एकत्र जोडण्यात आले आहे. याला ऑप्टोसार म्हटले जाते. म्हणजे हा उपग्रह रंगीत, स्पष्ट आणि सर्व ऋतूत उपयुक्त छायाचित्रे प्रदान करणार आहे. शेतजमिनींची स्थिती, जमिनीतील बदल, नव्या इमारतींची निर्मिती किंवा वाहतूक यासारखी माहितीही हा उपग्रह टिपू शकतो. हा उपग्रह 1.8 मीटर रिझोल्यूशनपर्यंतची छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे. म्हणजेच जमिनीवर छोटे-छोटे बदलही याच्या नजरेपासून वाचू शकणार नाही.

हे तंत्रज्ञान सैन्य, आपत्ती व्यवस्थापन, कृषी आणि शहरी देखरेखीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. खासकरून मान्सून, पूर, सीमा सुरक्षा आणि रात्रीच्यावेळी देखरेख यासारख्या क्षेत्रांमध्ये याची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

Advertisement
Tags :

.