For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रोअर ईजी सिग्मा’ ईव्ही दुचाकी लाँच

06:42 AM Aug 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘रोअर ईजी सिग्मा’ ईव्ही दुचाकी लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

बेंगळुरू येथील स्टार्टअप ओबेन इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात रोअर ईजी सिग्मा ही एक नवीन इलेक्ट्रिक दुचाकी लाँच केली आहे. गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.27 लाख रुपये आहे. या सुरुवातीच्या किमती आहेत.

इलेक्ट्रिक बाईक दोन प्रकारांमध्ये देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 175 किलोमीटर धावू शकते. यात नवीन टीएफटी कन्सोल आणि रिव्हर्स मोड आहे. डिझाइन : ओबेन रोअर ईजी सिग्मा बाईकमध्ये गोल हेडलाइट्स दिले असून ही बाईक 4 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक रेड, फोटॉन व्हाइट, इलेक्ट्रो अंबर आणि सर्ज सायन. त्याची निओ-क्लासिक एआरएक्स फ्रेम ट्रॅफिकमध्ये चपळ बनवते. 17-इंच अलॉय व्हील्स आणि 130/70-17 टायर्स चांगली रोड ग्रिप देतात. एलईडी हेडलॅम्प, टेललॅम्प आणि विंकर्स एक शार्प लूक देतात.

Advertisement

परफॉर्मन्स: 175 किमी रेंज आणि 95 किमी प्रतितास टॉप स्पीड

नवीन ओबेन बाईकला इतर कोणत्याही मॉडेलपेक्षा वेगळी इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. हार्डवेअर: एकत्रित ब्रेकिंग सिस्टमसह डिस्क ब्रेक ही इलेक्ट्रिक बाईक स्टीलच्या चेसिसवर बनवली आहे. आरामदायी रायडिंगसाठी तिच्या समोर 37 मिमी टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन आहे.

Advertisement
Tags :

.