बीएमडब्ल्यू कारची 5 वी आवृत्ती लाँच
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जगातील दिग्गज कार निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यू यांनी 5 आवृत्ती भारतीय बाजारात सादर केली आहे. प्रीमियम सेडान ही जर्मन कार उत्पादक कंपनीची पहिली राइट हँड ड्राईव्ह कार आहे आणि चीननंतर भारत ही तिसऱ्या नंबरची कारविक्रीतील मोठी बाजारपेठ आहे, जिथे ही कार दाखल झाली आहे. त्याचवेळी, कंपनीची ही लक्झरी सेडान बीएमडब्ल्यू 3 सीरीज आणि बीएमडब्ल्यू 7 सीरिजनंतर भारतातील तिसरी सर्वाधिक व्हीलबेस असणारी कार आहे. या गाडीचा बाह्या भाग आकर्षक शैलीत रचण्यात आला आहे. केबिनही सुधारीत स्वरुपात साकारण्यात आली आहे. कंपनीने याला 530एलआय एम स्पोर्ट्स या एकाच प्रकारात सादर केले आहे. याची किंमत 72.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही नवी गाडी आगामी नवीन पिढीच्या मर्सिडीज-बेंझ ई-क्लास सोबत ऑडी ए 6 आणि व्होल्वो ए90 सोबत स्पर्धा करणार असल्याचे समजते. कंपनीने कारमध्ये सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे.