For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौंडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार

06:47 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौंडवाल  यांना लता मंगेशकर पुरस्कार
Advertisement

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर

Advertisement

मुंबई :

   सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. वर्ष 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौंडवाल यांना जाहीर झालेला आहे. शास्त्राrय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्राrय संगीत क्षेत्राची सेवा  केल्याबद्दलच्या त्यांच्या विशेष योगदानाबद्दल वर्ष 2024 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्राrय संगीत जीवन गौरव पुरस्कार हा आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.

Advertisement

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार वर्ष 2024 साठी  मराठी रंगभूमीवर कार्यकतफ&त्वाचा ठसा उमटवण़ाऱ्या प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव वर्ष 2024 चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल वर्ष 2024 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना देण्यात येणार आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार वर्ष 2023 साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर वर्ष 2024 साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना मिळाला आहे. तसेच बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही यावेळी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली आहे.

तज्ञ समिती मार्फत पुरस्कारांची शिफारस

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे. विविध क्षेत्रात योगदान देण़ाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये बारा वर्गवारींचा समावेश

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ष 2024 चा नाटक विभागासाठीचा  पुरस्कार  विशाखा सुभेदार, उपशास्त्राrय संगीत वर्गवारीमध्ये  डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्राचा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे, नफत्य वर्गवारीत श्रीमती सोनिया परचुरे, चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे. तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात नागेश सुर्वे (ऋषीराज), तमाशा वर्गवारीतील  राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास माऊती सावंत तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये  शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारचे स्वरुप 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येण़ाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या पूर्वी  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लाख, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता 10 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे करण्यात आले आहे.  राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, या पूर्वी  पुरस्काराचे स्वरूप एक लाख ऊपये, मानचिन्ह व मानपत्र होते, तर आता या पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रोख, मानपत्र व मानचिन्ह असे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.