For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटच्या क्षणी जर्मनीला धक्का, स्पेन उपांत्य फेरीत

06:29 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेवटच्या क्षणी जर्मनीला धक्का  स्पेन उपांत्य फेरीत
Spain's Lamine Yamal, 3rd left, dribbles with the ball during a quarter final match between Germany and Spain at the Euro 2024 soccer tournament in Stuttgart, Germany, Friday, July 5, 2024. AP/PTI(AP07_05_2024_000368B)
Advertisement

वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट (जर्मनी)

Advertisement

स्पर्धेतील यजमान जर्मनीला रोमांचक उपांत्यपूर्व फेरीत हरवल्यानंतर स्पेन आणि त्याच्या चाहत्यांनी जणू युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्याप्रमाणे आनंद साजरा केला.  स्पॅनिश संघाला पुढील आठवड्यात बर्लिनमध्ये ट्रॉफी उंचावण्याची मोठी संधी आहे.

119 व्या मिनिटाला बदली खेळाडू मिकेल मेरिनोच्या हेडरमुळे स्पेनने शुक्रवारी अतिरिक्त वेळेत 2-1 असा विजय मिळवला. 1991 मध्ये स्टुटगार्टविऊद्ध यूएफा कपमध्ये ओसासुनासाठी याच स्टेडियममध्ये गोल केल्यानंतर त्याचे वडील मिगुएल मेरिनोने ज्या प्रकारे आनंद व्यक्त केला होता त्याचीच नक्कल करत मेरिनोने कोपऱ्यातील ध्वजाभोवती धावून आनंद साजरा केला.

Advertisement

नियमित वेळेच्या शेवटच्या मिनिटाला फ्लोरियन विर्ट्झने साधलेल्या बरोबरीमुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. मेरिनोला विजयी गोलासाठी ज्याने चेंडू पुरविला त्या डॅनी ओल्मोने दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीलाच सलामीला गोल केला. लक्षणीय बाब म्हणजsि तिन्ही गोल बदली खेळाडूंकडून झाले. स्पेनचा बचावपटू दानी कार्वाजल याला अतिरिक्त वेळेच्या उशिरा दुसरे पिवळे कार्ड दाखविल्याने मैदानाबाहेर जावे लागले. फ्रान्सविऊद्धच्या मंगळवारच्या उपांत्य फेरीतील सामन्यात त्याला निलंबित केले जाईल. सहकारी बचावपटू रॉबिन ले नॉर्मंड देखील दुसऱ्यांदा कार्ड दाखविण्यात आलेले असल्याने तो सामना गमावेल.

स्पेनने मागील 10 प्रयत्नांत प्रथमच एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या यजमानांना पराभूत केलेले आहे. जर्मनीचा मिडफिल्डर टोनी क्रूस त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीच्या अंतिम सामन्यानंतर म्हणाला, ‘आम्ही खूप जवळ होतो, त्यामुळेच ते खूप कटू होते’. 2014 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेल्या क्रूसने जर्मनीची ही मोहीम संपल्यावर निवृत्त होणार असल्याचे सांगितले होते.

Advertisement
Tags :

.