पोलीस पाटील पदासाठी शेवटची संधी
26 डिसेंबर पर्यंत भरता येणार अर्ज ; सावंतवाडी,दोडामार्ग ,वेंगुर्लेत होणार भरती
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी,दोडामार्ग ,वेंगुर्ले या तीन तालुक्यात पोलीस पाटील पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात जवळपास 31 महसूल गावांमध्ये आरक्षणामुळे एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे या 31 गावांमध्ये सर्वसाधारण आरक्षण आता टाकण्यात आले आहे. त्यात जवळपास सात गावांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. आता या 31 गावांसाठी 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी 6:15 या वेळेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. आता या 31 गावांसाठी हे सर्वसाधारण आरक्षण पडले असून ही शेवटची संधी आहे. या कालावधीत या कुठल्याही गावात एकही अर्ज प्राप्त झाला नाही. तर, पुन्हा या गावांमध्ये पोलीस पाटील पदासाठी निवड प्रक्रिया होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे गेली पाच-दहा वर्षानंतर प्रथमच या तिन्ही तालुक्यात पोलीस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता अंतिम अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर आहे. सावंतवाडी तालुक्यात एकूण 23 गावात 60 अर्ज प्राप्त आहेत. तर अजून 13 गावात एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आता अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर व तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.