For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमधील कुरापतींमागे ‘लष्कर-ए-तोयबा’

06:01 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमधील कुरापतींमागे ‘लष्कर ए तोयबा’
Advertisement

सध्या इस्लामाबादमधील बेस कॅम्पमध्ये वास्तव्य : दहशतवादी घटनांबाबत गुप्तचर यंत्रणांना सुगावा

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

गेल्या महिन्यात जम्मूमध्ये झालेल्या तीन मोठ्या दहशतवादी घटना आणि राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. या सर्व दहशतवादी घटनांमागे लष्कर-ए-तोयबाचा प्रशिक्षित दहशतवादी साजिद जट असल्याचा दावा गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी केला आहे. साजिद जट हा सध्या इस्लामाबादस्थित आपल्या बेस पॅम्पमध्ये राहत आहे. यापूर्वी तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये बराच काळ सक्रिय होता. साजिद जटसोबत त्याची भारतीय वंशाची पत्नीही इस्लामाबादमध्ये राहत असल्याचा सुगावा भारतीय गुप्तचर यंत्रणांना लागला आहे.

Advertisement

साजिद जट सध्या लष्कर-ए-तोयबामधील भरतीचे काम सांभाळत आहे. त्याचवेळी सीमेपलीकडून भारतात दहशतवाद्यांना पाठवण्याचे काम पूर्ण करण्यातही त्याचा सक्रिय सहभाग असतो. साजिद हा लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनल कमांडर असल्याचेही सांगितले जात आहे. दहशतवादी घटनांसाठी टेरर फंडिंगची जबाबदारीही लष्करने साजिदवर सोपवली आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये साजिद जटचा सहभाग आहे.

साजित जट याचा कासिम नामक एक साथीदार जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असून त्याचा शोध सुरू आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) साजिद जटवर 10 लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. साजिद जटचे नाव एनआयएच्या वाँटेड यादीतही समाविष्ट आहे. सफिउल्ला उर्फ साजिद जट हा शांगमंगा, जिल्हा कसुर, पंजाब, पाकिस्तान या गावचा रहिवासी असून त्याचे लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनांशी खोलवर संबंध असल्याची माहिती एनआयएकडे आहे.

Advertisement
Tags :

.