मिरवणुकीत लेसरचा मारा...१० अध्यक्षांवर गुन्हा! संजयनगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्याची कारवाई
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्याने थेट कारवाईचा बडगा
सांगली प्रतिनिधी
लेसर लाईटमुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा होत आहे. त्यातच मोबाईलही खराब होत आहेत. त्यामुळे या लेसरलाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण ही बंदी घालूनही अनेक गणेश मंडळांनी याचा वापर केला त्या दहा मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत या लेसर लाईटचा मारा करणाऱ्या मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, लाईट मालक यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दहा मंडळांचे पदाधिकारी आाणि लाईट मालक अशा एकूण 33 जणांविरूद्ध सांगली शहर पोलिस ठाणे आणि संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
लेसर लाईटमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होत आहेत. नेत्ररोगतज्ञांच्या संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बंदीची मागणी केली. कोल्हापुरात कार्यकर्त्याच्या डोळ्याला इजा झाली होती. त्यानंतर तेथे बंदी आदेश लागू केला. त्यामुळे सांगली पोलिसांनी देखील जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून बंदी आदेश लागू करण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 14 सप्टेंबरपासून लेसर लाईटचा मिरवणुकीत वापर करण्यास बंदी घातली. त्याचा आदेश प्रासिद्ध केला. बंदी आदेश झुगारून सांगलीत नवव्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये काहींनी लेसर किरणांचा मारा केला. त्याबाबत पोलिसांनी नोंदी घेत, व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी नऊ मंडळांचे पदाधिकारी, संजयनगर पोलिसांनी एका मंडळाविरूद्ध कारवाई केली. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच लेसर मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले. एकूण 33 जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले.
या मंडळाच्या अध्यक्षांच्यावर गुन्हा दाखल
शिवमुद्रा मंडळ- शुभम सतीश शिरगावकर, अफताब बागवान, ईगल मंडळ- सुमित कुंभोजकर, रोहत दत्तात्रय कोळी, रियालन्स डिजिटल-शिवम श्रावण जाधव, सूर्यकांत पाटील, विश्वसंघर्ष मंडळ-नितीन किसन कलगुटगी, नीलेश शिवाजी कलगुटगी, अष्टविनायक मंडळ-विशाल आप्पासाहेब वडर, संजय सिद्धू वडर, जगदंब युवा प्रतिष्ठान-मोसीन फकीर जमादार, बलभीम मंडळ-पारस सदाशिव दोडमणी, रमेश दिलीप आवळे, स्वस्तिक चौक-गणेश महादेव जाधव, दीपक महादेव माळी, स्वागत मंडळ-गणेश आनंदराव सटाले, सुधाकर सूर्यकांत चंदना†शवे, एकता मंडळ- ऋा†षकेश दशरथ शिंदे, वैभव खोत. यांचा समावेश आहे.
या लेसर मालकांवरही कारवाई
सागर शिवाजी जगताप, शामराव नागे, ओंकार कोठावळे, अभिषेक महादेव खेमलापुरे, ओंकार दत्तात्रय गवंडी, सुशांत सुभाष देसाइ, अभिजित अशोक माळी, वासुदेव सुनील कांबळे, वैभव राजेंद्र मुंडे, मनोज अनिल घाटगे, निखिल किरण परदेशी, सोमनाथ धडे, सोहेल गौस मोमीन यांचा समावेश आहे.