लार्सन टुब्रोचा समभाग तेजीवर स्वार
06:15 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात कार्यरत लार्सन अँड टुब्रोचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात 6 टक्क्यांनी तेजीवर स्वार होताना दिसला आहे. इंट्रा डेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची कामगिरी समभागाने 17 महिन्यानंतर नोंदवली आहे. यापूर्वी 31 ऑक्टोबर 2024 समभाग 7.3 इतका इंट्रा डेदरम्यान सर्वाधिक वाढला होता. ट्रम्प यांनी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे घोषित करताच कंपनीचा समभाग तेजीत असताना दिसला. एकंदर मार्च महिन्यात कंपनीचा समभाग 22 टक्के इतका घसरत 3341 च्या स्तरावर आला होता. जो 4280 रुपयांच्या स्तरावर कार्यरत होता. मंगळवारी 5 टक्के वाढीसह 3515 रुपयांवर बंद झाला.
Advertisement
Advertisement