लार्सन टूब्रोचा समभाग घसरणीत
06:29 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा लार्सन अँड टूब्रो यांचा समभाग सोमवारी शेअर बाजारात कोसळताना दिसला. सोमवारी सदर कंपनीचा समभाग शेअरबाजारात इन्ट्रा डे दरम्यान 7 टक्के खाली येत 3960 रुपयांवर बीएसईवर कार्यरत होता. 11 महिन्यांनंतर समभागाच्या भावाने नीचांकी स्तर गाठला. यापूर्वी पाहता 7 एप्रिल 2025 रोजी कंपनीचा समभाग 9 टक्के इतका घसरला होता. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये हा समभाग घसरणीत आघाडीवर राहिला होता. समभागाने 24 फेब्रुवारी 2026 रोजी 4440 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता.
Advertisement
Advertisement