For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लार्सन अँड टुब्रोला मिळाले मोठे कंत्राट

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
लार्सन अँड टुब्रोला मिळाले मोठे कंत्राट
Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

पायाभूत सुविधा व बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रोला मध्य आशियामधून कामाचे मोठे कंत्राट प्राप्त झाले आहे. या अंतर्गत कंपनीला गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे काम हाती घ्यावे लागणार आहे. 5 हजार ते 10 हजार कोटी रुपयांचे हे कंत्राट कंपनीने प्राप्त केले आहे. या बातमीनंतर शेअर बाजारामध्ये लार्सन टुब्रो यांचे समभाग 2 टक्के वाढत बीएसईवर गुरुवारी इंट्रा डे दरम्यान 3611 रुपयांवर पोहोचले होते. या कंत्राटा अंतर्गत कंपनी 56 गॅस पाईपलाईन मध्य आशियातील विविध भागांमध्ये घालण्याचे काम करणार आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये कंपनीचा समभाग जवळपास 10 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. गेल्या सहा महिन्यात हा समभाग 23 टक्के इतका वधारला आहे. याआधी कंपनीला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मदुराई तामिळनाडू यांच्यामार्फत कामाचे कंत्राट प्राप्त झाले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.