For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वाधिक खाऱ्या पाण्याचा तलाव

07:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वाधिक खाऱ्या पाण्याचा तलाव
Advertisement

उणे 58 अंश सेल्सिअसमध्येही गोठत नाही पाणी

Advertisement

समुद्राच्या पाण्यात मीठ असते हे सर्वांनाच माहिती आहे. मीठ असल्यामुळे पाण्याचे घनत्व हे नदी किंवा तलावाच्या तुलनेत  अधिक असते. परंतु जगात एक असा तलाव आहे, ज्याच्या पाण्याचे घनत्व इतके अधिक आहे की उणे 58 अंशापर्यंत तापमान खालावल्यावरही पाणी गोठत नाही. याचबरोबर याचे घनत्व मृत समुद्रापेक्षाही अधिक आहे. हा अनोखा तलाव अंटार्क्टिकामध्ये आहे. अंटार्क्टिकाच्या मॅकमुर्डोज ड्राय व्हॅलीतील तलाव डॉन जुआन हा जगातील सर्वाधिक खारट पाण्याचा स्रोत आहे. याचे पाणी मृत समुद्रापेक्षाही अधिक खारं आहे. याचमुळे तापमान उणे 58 सेल्सिअसपर्यंत खालावल्यावरही हा तलाव गोठत नाही. हा तलावर सुमारे 4 इंच खोल असून प्रत्यक्षात हा तलाव कमी आणि मोठा ख•ा अधिक वाटतो. परंतु या तलावाने वैज्ञानिकांना अनेक वर्षांपासून चकित केले आहे.

अनोखी संरचना असलेल्या या तलावाचा शादा 1961 मध्ये वैज्ञानिकांनी लावला होता. ज्या ठिकाणी तापमान उणे 58 अंशांवर पोहोचते, तेथे पाण्याचा हा छोटासा स्रोत गोठत का नाही असा प्रश्न वैज्ञानिकांना पडला होता. त्याचवेळी तलावाच्या पाण्याचे परीक्षण करण्यात आले आणि यात तलावाच्या पाण्यात 40 टक्के मीठ असल्याचे आढळून आले. मृत समुद्रातील पाण्यात मिठाचे प्रमाण 34 टक्के आहे. तर जगातील सर्व महासागरांचे पाणी 3.5 टक्क्यांपर्यंत खारे आहे. ग्रेट सॉल्ट लेकमदये 5-25 टक्क्यांपर्यंत मीठ आहे. हा तलाव पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक मॅकमुर्डोज ड्राय व्हॅलीत आहे. येथे पाऊस पडत नसतो. तसेच येथे 321 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असतात. अंटार्क्टिकात असून येथे बर्फ पडत नाही.

Advertisement

तलावात पाणी कुठून येते?

या ठिकाणाच्या आसपासचे तलाव थंडीत गोठून जातात आणि त्यावर बर्फाचा मोठा थर जमा होतो. परंतु डॉन जुआन तलाव गोठत नाही. याचे कारण यातील अत्यंत अधिक प्रमाणात असलेले कॅल्शियम क्लोराइड सॉल्ट आहे, जे पाण्याला फ्रीजिंग पॉइंटखाली आणते आणि गोठू देत नाही. हा तलाव भूमिगत पाण्याने भरत असल्याचे वैज्ञानिकांना वाटत होते. परंतु 10 वर्षांपूर्वी ब्राउन विद्यापीठाच्या संशोधकांना हे खारट पाणी प्रामुख्याने हवेतून येत असल्याचे आढळून आले. त्यांनी कॅमेरे लावुन मातीत असलेले मीट हवेतील आर्द्रता शोषून घेत असल्याचे दाखवून दिले. या प्रक्रियेला तरलीकरण म्हटले जाते. हे खारट पाणी मग हळूहळू तलावात जमा होऊ लागते आणि वितळलेल्या बर्फासोबत मिसळते. वैज्ञानिकांना इतक्या दुर्गम स्थितीतही जीवजंतूंचे पुरावे मिळाले आहेत. यामुळे जर येथे जीवन असण्याची शक्यता असेल तर मंगळ ग्रहावरही असेल असे त्यांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.