सांगलीतील मिरजेत मेफेनटर्माईनचां मोठा साठा जप्त
14 लाखाचे 1500 इंजेक्शन जप्त; तिघांना अटक
सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई
सांगली
सांगलीतील मिरजेत पोलिसांनी छापा टाकून मेफेनटर्माईनचां मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली आहे. रोहित कागवाडे, ओंकार मुळे आणि आशपक पटवेगार अशी त्यांची नावे आहेत. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केलीय. मिरजेत नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून संशयीतास अटक केली होती. यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेनटर्माईन इंजेक्शन मिळून आला होता. या कारवाईमध्ये एका मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेनटर्माईनचां साठा तेथून तो पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेतील संबंधित मेडिकलवर छापा टाकून तब्बल 14 लाखाचे 1500 इंजेक्शन आणि 176 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेनटर्माईन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. दरम्यान सर्व संशयीतांनी नशेचे इंजेक्शन कोठून आणले व त्याची कोठे कोठे विक्री केली जात होती, याचा देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सांगली जिल्हा पोलिस दलाकडून कारवाई करण्यात आली आहे. कारवाई एकूण ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तपास पुढे जाईल तसे अनेक आरोपी समोर येऊ शकतात. तसेच यामागे मोठ रॅकेट असु शकते. हा ड्रग्जचा साठा बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेला होता. या साठ्यावर अन्न व औषध विभागाच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १४ लाख ४६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सरकारच्या नशामुक्त भारत अभियानमध्ये सांगली जिल्हा पोलिस कटीबद्ध आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांना अशी कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी. जेणेकरून पोलिसांना त्वरित कारवाई करता येईल, अशी प्रतिक्रिया सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी यावेळी दिली.