For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हजगोळीत ड्रग्जचा मोठा साठा जप्त

07:52 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
हजगोळीत ड्रग्जचा मोठा साठा जप्त
Advertisement

पुणे येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई : मुंबई, कर्नाटक कनेक्शन : परिसरात खळबळ

Advertisement

तुडये/वार्ताहर

हाजगोळी (ता. चंदगड) हद्दीतील सरोळी रस्त्याशेजारील पोल्ट्रीत पुणे येथील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने शनिवारी सायंकाळी छापा टाकत एमडीएम ड्रग्जचा मोठा साठा व निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.   ढोलगरवाडी येथील चार वर्षापूर्वी आणि म्हाळेवाडी येथील फार्मसिस्टनी केलेले ड्रग्ज प्रकरणानंतर शनिवारी झालेली हाजगोळी येथील मोठी करवाई आहे. तालुक्यातील एमडीएम ड्रग्ज कनेक्शन थेट मुंबईपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरोळी-हाजगोळी रस्त्याजवळील पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पुणे येथील पथकाने छापा टाकत या ठिकाणी सापडलेल्या एमडीएम ड्रग्ज व ते बनविण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री जप्त केली. कुर्ला मुंबई येथील सापडलेल्या तीन आरोपींना पकडल्यानंतर पुढील तपासात  बेळगाव येथील दोन, तुडये येथील दोन, हाजगोळी व सरोळी येथील प्रत्येकी एक आशा नऊ संशयितांना तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूरहून फॉरेन्सिक लॅब पथक आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करूनच किती रकमेचा साठा आहे ते समजेल.या कारवाईसाठी अमली पदार्थ विरोधी पथक, गडहिंग्लजचे उपअधीक्षक विवेक पाटील, चंदगड पोलिसांसह मोठा पोलीसफाटा दाखल झाला होता.

पप्पू विठ्ठल मलतवाडकर (वय 28, रा. सरोळी), संतोष सदानंद बसरीकट्टी (वय  30), किरण अशोक शिंदे (वय 28, रा. तुडये), रोहित शिंदे (वय 30, रा. हाजगोळी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पथकाकडून जप्त केलेल्या एकूण साहित्यांची तपासणी करण्यात येत आहे.

तीन दिवसांपूर्वी पथक तुडये परिसरात, परिसरातील पहिलीच मोठी कारवाई

पुणे येथील अमली पदार्थविरोधी पथक तीन दिवस तुडये परिसरात फिरत होते. बेळगाव-कर्नाटक राज्याच्या हद्दीजवळील या परिसरात अवैध धंद्याची रेलचेल कायमच असते. चक्क एमडीएम ड्रग्जची कारवाई मुंबई, पुणे येथील पथकाने केली. मग चंदगड पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत कोणताच सुगावा लागला नाही, याचे आश्चर्य परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.