महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केरळमध्ये मोठय़ा प्रमाणात स्फोटके जप्त

07:00 AM Aug 05, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पलक्कडमध्ये पोलिसांची कारवाई : जिलेटिनच्या 8 हजार कांडय़ा हस्तगत

Advertisement

वृत्तसंस्था /पलक्कड

Advertisement

केरळच्या पलक्कडल येथील ओगलूरमध्ये मोठय़ा प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये 40 बॉक्समध्ये ठेवण्यात आलेल्या जिलेटिनच्या 8 हजार कांडय़ा सामील आहेत. पलक्कड जिल्हय़ातील शोरनूरनजीक वतनमकुरुशीमध्ये एका खाणीत ही स्फोटके आढळून आली आहेत.

स्फोटकांबद्दल स्थानिक लोकांकडून कळविण्यात आले होते. जिलेटिनच्या कांडय़ांचा वापर खाणकामासाठी केला जात होता असा संशय आहे. याप्रकण्री गुन्हा नोंदवून तपास सुरु केला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

यापूर्वी नोव्हेंबर 2000 मध्ये पोलिसांनी पलक्कडच्या वालयार येथे एका मिनी लॉरीमधून 7,500 डेटोनेटर आणि जिलेटिनच्या 7,000 कांडय़ा जप्त केल्या होत्या. ही स्फोटके तामिळनाडूच्या इरोड येथून एर्नाकुलम जिल्हय़ातील अंगमाली येथे नेण्यात येत असताना पोलिसांनी कारवाई केली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article