महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा जप्त

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुरक्षा दलांकडून पूर्व इम्फाळ-विष्णुपूरमध्ये शोधमोहीम

Advertisement

वृत्तसंस्था /इंफाळ

Advertisement

मणिपूरच्या पूर्व इम्फाळ आणि विष्णुपूर जिह्यांतील काही भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. झडतीदरम्यान 11 ग्रेनेड, सहा आयईडी, पाच 303 रायफल, तीन डिटोनेटर, एक कार्बाइन, एक हँडगन, विविध प्रकारचे बॉम्ब, दारूगोळा आणि चार वॉकीटॉकी सापडल्या.

डोंगर आणि खोऱ्यातील संवेदनशील भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. यादरम्यान विष्णुपूर जिह्यातील हाय पॅनॉलजवळ केनू मॅनिंग येथे झडतीदरम्यान एक एसएमजी कार्बाइन, एक नऊ एमएम पिस्तूल, नऊ ग्रेनेड, दोन स्मॉग बॉम्ब आणि विविध शस्त्रे जप्त करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. अन्य एका कारवाईत, पूर्व इंफाळ जिह्यात झडतीदरम्यान पाच 303 रायफल, दोन 12-बोअर बंदुका, तीन मोर्टार, एक नऊ मिमी पिस्तूल, स्फोटके आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. सीआरपीएफ आणि मणिपूर पोलिसांच्या समन्वयाने निमलष्करी दलाने गुरुवारी जिरीबाममध्ये एक घर जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर बुधवारी संयुक्त शोधमोहीम राबवली, असे आसाम रायफल्सने सांगितले.

मणिपूरमध्ये एक वर्षापासून हिंसाचार

मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षापासून हिंसाचार सुरू आहे. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ गेल्यावषी 3 मे रोजी पहाडी जिह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आल्यानंतर संघर्ष सुरू झाला. तेव्हापासून राज्यात 180 हून अधिक जणांना प्राणस मुकावे लागले. या हिंसाचारात हजारो लोक बेघर झाले असून कित्येक लोक छावण्यांमध्ये राहत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article