For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Market | कोल्हापूर बाजार समितीत पालेभाज्यांची मोठी आवक; कोथिंबीरच्या ४६ हजार पेंढ्या दाखल!

03:51 PM Mar 24, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur market   कोल्हापूर बाजार समितीत पालेभाज्यांची मोठी आवक  कोथिंबीरच्या ४६ हजार पेंढ्या दाखल
Advertisement

         कोल्हापूर बाजारात भाजी-फळांची आवक वाढली

Advertisement

कोल्हापूर -कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक समाधानकारक राहिली. वाढत्या उन्हाचा परिणाम काही विशिष्ट फळांच्या दरांवर दिसून येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने बाजारपेठेत लिंबू, टरबूज आणि आंब्याची मागणी वाढली आहे. त्यानुसार दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

कोबी आणि वांग्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. वांग्याचे दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान राहिले, तर टोमॅ टो प्रति १० किलो ५० ते १५० रुपये दराने विकला गेला. हिरव्या मिरचीची आवक मोठी असून तिला ४५० ते ५५० रुपये (१० किलो) असा दर मिळाला आहे. मेथीची १३,००० पेंढ्यांची आवक झाली असून, शेकडा दर ३०० ते ६०० रुपयांपर्यंत राहिले आहेत. कोथिंबीरची आवक सर्वाधिक ४६,००० पेंढ्या इतकी झाली असून, प्रति शेकडा ३०० ते ५०० रुपये भाव मिळाला. पालक, शेपू आणि पोकळा यांसारख्या पालेभाज्यांचे दरही स्थिर आहेत.

Advertisement

फळबाजारात चैतन्य : हापूसची एन्ट्री
फळ विभागात रत्नागिरी / वेवगड हापूसच्या पेटीला (४ डझन) ८०० ते २००० रुपयापर्यंत वर मिळत आहे, तर मद्रास हापूस ४०० ते ५०० रुपये प्रति पेटी वराने उपलब्ध आहे. उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी प्रचंड वाढली असून एका चुंबड्याचा (पोत्याचा) वर १००० ते २००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Advertisement
Tags :

.