kolhapur market | कोल्हापूर बाजार समितीत फळभाज्यांची मोठी आवक; कोबी, वांगी आणि टोमॅटोचे दर स्थिर
बाजार समितीत 'हापूस'ची दिमाखात एन्ट्री
कोल्हापूर - कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाज्या आणि फळांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. यामध्ये कोबी, वांगी आणि टोमॅ टोची आवक लक्षणीय असून, दरांमध्ये काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भाज्यांचे दर स्थिर बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची २४,५०० पेंढ्यांची आवक झाली असून, तिला प्रति शेकडा ४०० ते ६०० रुपये दर मिळाला आहे. मेथीची १२,५०० पेंढ्यांची आवक झाली असून ५०० ते ९०० रुपये दराने विक्री झाली.
फळभाज्यांचे दर (प्रति १० किलो)
वांगी -१०० ते ३०० रुपये
टोमॅटो-५० ते १२० रुपयेमिरची
भेंडी - ४०० ते ६०० रुपये
कारली - २५० ते ४५० रुपये
फळांच्या बाजारात हापूसची एन्ट्री
फळ विभागात आंब्याची आवक सुरू झाली असून, 'आंबा हापूस'ला प्रति बॉक्स १५०० ते २५०० रुपये दर मिळत आहे. सफरचंद (डेलीसन) ८०० ते १४०० रुपये प्रति बॉक्स तर द्राक्षांची आवक १८३ क्विटल झाली असून २० ते ६० रुपये प्रति किलो असा दर राहिला. कांदा-बटाटा विभागातही आवक समाधानकारक असून, सर्वच शेतीमालाला सरासरी चांगला भाव मिळत असल्याचे बाजार समितीचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.