कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लापीट, शेडडू, पनवत, भिजूड...

02:51 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार विजय सरदेसाईचा तोल ढासळला : भाजप आमदार, मंत्र्यांना वापरले अशिष्ट शब्द,मुख्यमंत्र्यांना कोकणी शब्दकोश शिकण्याचा सल्ला

Advertisement

मडगाव : ‘लापीट’ हा शब्द गैर संसदीय असल्याचा दावा करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विरोधकांना गोव्यातील जनता गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला होता. मात्र, बुधवारी या शब्दाचा तसेच ‘शेडडू’ व ‘पनवत’ या शब्दांचा वापर करीत आमदार विजय सरेदसाई यांनी सत्ताधारी भाजपमधील आमदार व मंत्र्यांवर जोरदार घणाघात केला.  मुख्यमंत्र्यांनी अगोदर ‘लापीट’ या कोकणी शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा, त्यासाठी शब्दकोषाचा वापर करावा, असे सांगून हा शब्द गैर संसदीय नसल्याचा दावा आमदार विजय सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. जे कोणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतात ते ‘लापीट’ नव्हे तर कोण असा उलट सवाल ही त्यांनी उपस्थित केला. आपण कोकणी मोगी आहे. त्यामुळे कोकणी शब्दाचा अर्थ कुणी आपल्याला सांगण्याची गरज नाही असे ते म्हणाले. दिगंबर कामत तसेच इतर जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले. देवासमोर शपथ घेतली व त्यांनी देवालाच फसविले आणि भाजपमध्ये प्रवेश केला  ते लापीट ठरतात असा दावा विजय सरदेसाई यांनी यावेळी केला. सुदिन ढवळीकर यांनी तृणमूल काँग्रेसशी युती केली, तेव्हा त्यांनी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध केला होता. पण, आज ते भाजप सरकारात मंत्री आहेत. भाजप सरकारात मंत्री असल्याने ते रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे समर्थन करतात. ते रंग बदलणारे ‘शेडडू’ आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. लोकसभा निवडणूक झाल्यावर सुदिन ढवळीकर यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना मंत्रीपदी कायम ठेवणार याची हमी भाजपमधील कोणती व्यक्ती देऊ शकते हे अगोदर सांगावे. मंत्रीपद जाऊ नये यासाठी ढवळीकर यांची धडपड सुरू आहे. भाजप सांगतात त्याप्रमाणे ते विधाने करतात. ढवळीकर यांचे मंत्रीपद काढून घेतल्यानंतर मगोचे आमदार जीत आरोलकर यांना ते दिले जाणार असल्याचे सरदेसाई म्हणाले.

Advertisement

दिगंबर कामत ही ‘पनवत’...

दिगंबर कामत यांनी देवासमोर शपथ घेतली व देवाला फसवून भाजपमध्ये प्रवेश केला. ते स्वत:ला ‘फायटर’ म्हणत असतील. पण, ते कसले फायटर? ते तर ‘भिजूड’ म्हणून पळून जातात. आता ते पल्लवी धेंपेच्या प्रचारात उतरले आहेत. मात्र, त्यांच्यामुळे पल्लवी धेंपेच्या मतामध्ये घट होईल. ते पनवती असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. दिगंबर कामत व दामू नाईक हे फातोर्ड्यात प्रचार करतात. आम्ही एकच जाहीर सभा घेऊन शक्ती प्रदर्शन घडविणार आहोत. तसेच मडगावात गल्ली गल्लीत प्रचार करणार असल्याचे सांगत दिगंबर कामत यांना आव्हान दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article